अभागी...भाग 15

  • 7.5k
  • 3.6k

वेरूळ लेणी पाहान्यासाठी पुढील प्रवास सुरू झाला..सर्व जण ओळीने लेणी पाहण्यासाठी गेले..आत जाताना तर सर्व जण ओळीने गेले पणं नंतर मात्र सर्व जण विखुरले .. जो तो ..त्याला जी मूर्ती आवडेल तिकडे जाऊन त्या मूर्ती सोबत सेल्फी घेऊ लागला..मधू तिकडी..म्हणजेच मधू ,सायली आणि अनु एक भव्य शिल्प पाहत उभ्या होत्या.त्यात रावण कैलास पर्वत हलवताना दिसत होता.आणि भगवान शिव उजव्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबत होते..पार्वती माता निर्भय दिसत होती तर रावण महाशय मात्र हतबल झालेले दिसत होते..आणि नंदी व इतर भक्तगण आनंदाने भजन करताना दिसत होते..आजू बाजूला दोन भव्य खांब होते त्यावर सुंदर नक्षी काम केलेलं होत...खूप सुंदर अस ते