अभागी...भाग 17

  • 8.3k
  • 1
  • 4k

कॉलेज सुटल्यावर मधू घरी गेली .. हातातला वेगवेगळ्या फुलांचा सुंदर बुके पाहून आई ने कोणी दिला ग फार छान आहे अस म्हणाली तेव्हा मधू थोडी गोंधळली..अग कॉलेज मध्ये मैत्रिणींनी दिला अशी थाप मारून ती रूम मध्ये गेली.. टेबल वर असलेल्या फ्लॉवर पॉट मध्ये तिने त्या बुके मधली सारी फुल कोंबली ..आता तर ती जास्तच सुंदर दिसत होती..ती फुल जवळ घेऊन तिने त्यांचा परत एकदा सुगंध घेतला..आणि मग जेवण करून आई ला मदत करू लागली..संध्याकाळी बाबा नी छोटासा केक आणला..सायली ,अनु ही आल्या मधुचा छोटा च पणं एकदम मस्त बडे साजरा झाला .मधू खूप खुश होती..रात्री झोपताना तिला साया ची आठवण