रुबाब

  • 7.8k
  • 1
  • 2.5k

रुबाब विवेकचे लग्न पाचच दिवसांवर आले होते. मुलगी त्याला अगदी मन पसंद,जशी प्रतिमा मनात रंगवली होती अगदी तशीच मिळाली होती.तिच्या सौंदर्यापुढे सुंदर हा शब्दही फिका वाटत होता.नाकीडोळी रेखीव,ओठ जणु गुलाबाच्या पाकळया,पाणीदार डोळे,कोरीव भुवया,गौर वर्ण,काळेभोर लांबसडक केस आणि एखाद्या साच्यातून मुर्ती साकारावी तसा शरीराचा आकृतीबंध अशा अप्रतिम सौंदयाची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे यामुळे तो मनोमन खूष होता. पंधरा दिवसांपुर्वीच त्याचा अत्यंत जवळचा मित्र,बालपाणापासूनचा लंगोटीयार व व्यावसायिक पार्टनर जितुचं लग्न झालं होतं. जितुच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरभर आणि सर्व मित्र परिवारात होत होती. लग्न होवून पंधरा दिवस होवून गेले तरी त्या लग्नाची चर्चा अद्याप चालू होती. त्या लग्नाच्या रुबाबाची