शोध ( रहस्यकथा )

  • 11.2k
  • 2
  • 4.7k

------------------------------------------------------------ शोध ( रहस्य / रोमांचक / थरारक / दीर्घकथा )------------------------------------------------------------ " सचिन दादाsss काव्याला पाठवा..वेळ झाला आहे." उकळलेला गरम चहा कपात ओतत असतानाच सचिनच्या कानावर आवाज पडला." आत याss उशीर झालाय आज." सचिनचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या किशोरीने ऐकला. तशी ती लगबगीने दारातून आत शिरत किचनमध्ये गेली.सचिनने चहाचे दोन कप उचलून टेबलवर त्याची मुलगी काव्यासमोर ठेवले.आणि तिच्याशेजारील खुर्चीवर बसत त्याने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिचा निरागस कोमल