वसुंधरा

  • 6k
  • 2.3k

यंदा पाऊसकाळ चांगला झाला होता. सगळं शिवार हिरवागार शालु पांघरल्यासारखं दिसत होतं. पाखरं आनंदानं बागडत होते. पिकं वाऱ्यावर डोलत होते. झाडं, वेली फळाफुलांनी बहरले होते, फळांनी लगडले होते. विहीरी, तलाव तुडुंब भरले होते. नद्या-ओढे ओसंडून वाहत होते. परिसरातील विहीरी पोहायला येणाऱ्या मुलांनी गजबजून गेल्या होत्या. गावातील आया-बाया नदीवर धुणं धुवायला जात होत्या. त्या बायांसोबतच अप्रतिम सौंदर्याची राणी ‘वसुंधरा’ पण धुणं धुवायला जायची.तिचा हळदीसारखा पिवळाधमक रंग, मुसमुशीत मदमस्त अंग, रेखीव शरीर, मादक चाल, सुंदर हास्य आणी लाघवी बोलणं पाहूनच गण्या तिच्या प्रेमात पडला होता.ती धुणं धुवायला बाहेर पडली की, गण्या तिच्या मागे-मागे जायचा. पण