कोंबडीचे प्रयत्न

  • 52.2k
  • 1
  • 17.1k

कोको कोबंडा गावभर हिंडत फिरायचा. तुरूतुरू चालायचा. त्याच्या डोक्यावरचा सरळ, उभा असा लालभडक तुरा कधी कधी एका बाजूस झुकलेला असायचा. त्याला तो शोभून दिसायचा. त्याचा चोचीचा खाली लालभडक कल्ला होता. संपूर्ण शरीर तपकीरी काळ्या पिसांनी झाकलेले होते. गावात चंदुशेट राहत होते. त्यांचा घराचे बांधकाम चालु होते. बांधकामाला लागणाऱ्या वीटा, वाळू बांधकामाजवळच ठेवल्या होत्या. तिथेच रस्त्याचा कडेला मातीचा ढीग होता. कोको कधी कधी तिथेच खेळत असे. असाच तो एके दिवशी नेहमीप्रमाणे त्या ढिगाऱ्यावरून वर खाली करत होता. तितक्यात कीको कोबंडी आली. किकोची पिसे पांढरीशुभ्र होती. ती आणि कोको एकत्र खेळायचे. त्या दोघाना नीलु बकरी झेब्रा म्हणायची. नीलु बकरी तिथेच बाजुला होती. ती म्हणाली,