बळी - १० कपाटातून रंजनाचे स्त्रीधन अचानक् अदृश्य झालेले पाहून घरातल्या सगळ्यांच्या चेह-याचे रंग उडाले होते. एकामागून एक धक्के बसत होते. शरीराने आणि मनाने थकलेल्या मीराताईंमध्ये आता उभं रहाण्याचीही शक्ती नव्हती. डोळ्यासमोर काळोखी येऊ लागली होती. त्या किर्तीला म्हणाल्या, ""घरात कोणी आलं नाही! कपाटातल्या वस्तू कुठे जाणार? तिथेच कुठेतरी ठेवल्या असशील! कीर्ती! इकडे ये; आणि जरा बघ बाळ!" मीराताई म्हणाल्या! कीर्तीने पूर्ण कपाट शोधून काढलं, पण तिला काहीही मिळालं नाही."नाही आई! कपाटात कपड्यांशिवाय काहीही नाही!" ती हताश स्वरात म्हणाली."कपाटाची चावी तुमच्या दोघांकडेच असते