ज्योतिर्गमय - प्रेरणा

  • 7.6k
  • 1
  • 2.2k

प्रेरणा ही व्यापक संकल्पना स्पष्ट करताना स्तंभलेखन प्रदीर्घ म्हणूनच रटाळ होऊ नये यासाठी आणि उद्बोधनासोबतच रंजन होण्यासाठी साहित्याच्या नवरसातील श्रुंगाररसाचे , आरंभ कथेसाठी चयन करीत आहे. या आधीच्या (उल्का-करूण रस, सुखी भव -शांत रस) कथांप्रमाणेच ,केवळ साहित्यप्रवाहातील रसानुभूती म्हणून गुणीजनांनी पाहावे , हा अनुरोध. नदी तटावरील सुजल , सुपीक अशी दोन गावे. नदीमुळे जलसंपन्न झालेली. खळाळत येणारी ती अवखळ तटीनी (नदी) ,गावामधून वाहताना मात्र आज्ञाकारी सुकन्येप्रमाणे वागायची. पण ऋतू आला. तिच्या सौंदर्यावर अनुरक्त सखा पयोद (ढग) वर्षाकाली बेधुंद बरसला. ऋतूस्नात प्रवाहिनी (नदी) कामार्त होऊन , तटांची मर्यादा लांघून जलपती (समुद्र) कडे निघाली. निघताना ती रतीमग्न अभिसारिणी धरणी मातेच्या