चंद्रिका - Body Shame, Missing Tile Syndrome

  • 8.2k
  • 2.1k

प्रस्तुत स्तंभ लेखनात मी body shame म्हणजे, शारीरिक त्रुटींबाबत व्यंगभाव बाळगणे, आणि missing tile syndrome यावर भाष्य करणार आहे. अवजड वैज्ञानिक संकल्पनेचे मी माझ्या मती, अनुभूतीनुसार विवेचन करीत आहे. प्रारंभीची बोध कथा मनोरंजन हेतू साध्य करो. सुसंपन्न राज्यात ,सुसंस्कारी राजा राणीला , कन्यारत्न प्राप्त होते. म्हणून जन्मसाफल्य झाल्याचा आनंद दोघांना होतो . चंद्रासमान सुंदर असणाऱ्या, राजकन्येच्या चेहऱ्यावर मोठा काळा तीळ असल्याने , तिचे नाव चंद्रिका ठेवले जाते. सुविद्य माता पिता तिला राजनीती , वेद यासोबत युद्ध ,संगीत आदी कलांचे यथोचित ज्ञान देऊन निपुण बनवतात. कन्या उपवर झाल्यावर , माता पित्याला तिच्या विवाहाची चिंता लागते . कारण त्या एका