टिटवीची अंडी

  • 11.2k
  • 3k

टुटु टिटवी समुद्राजवळ राहत होती. समुद्राचा किनाऱ्यावरून दिसणारा लांबेलांब समुद्र तिला खुप खुप आवडायचा. ती आकाराने लहानशी असली तरी ती कोणालाही घाबरायची नाही. समुद्राचा लाटावरून उडायला तीला खुप मजा वाटायची. ती जमिनीवरच तुरुतुरू चालत असे. तिची चोच लाल रंगाची होती. त्यामुळे ती इतर पक्ष्यापेक्षा वेगळी वाटे. तीचे डोके आणि पाठ काळ्या रंगाची होती तर तीचा खालील पोटाकडील भाग पांढरा रंगाचा तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा होता. पाय लांबट पिवळ्या रंगाचे होते आणि तिच्या दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले होते.तिथेच समुद्रकिनारी काहीवेळा कॉडी कासवीन येत असे. कॉडी कासवीनीला जेलीफिश व मासे खायला खुप आवडत असे. कधी कधी कॉडी कासवीन किनाऱ्यावर