माहिती, ज्ञान आणि शहाणपण

  • 15.8k
  • 1
  • 5.7k

माहिती ,ज्ञान आणि शहाणपण ह्या दैनंदिन जीवनातील उपयुक्त आधुनिक संकल्पना स्पष्टतेसाठी, प्राचीन कथेचे मी केलेले आविष्करण हि सर्वथैव माझी वैयक्तिक अनुभूती , मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांना आधारभूत ठेवून केलेली आहे. ज्ञानी ,शहाण्या गुणिजनांनी आपल्याठायी असणाऱ्या ज्ञान आणि शहाणपणाची जोड देऊन, ही अपूर्ण कलाकृती मनीमानसी पूर्ण करावी , हा विनम्र अनुरोध. निरागस बालमनावर गुरुकुलातील देवरूपी गुरूंचे संस्करण होत असे ,असा हा काळ . निः संग ऋषींचा ज्ञानरुपी सहवास लाभून , ज्ञानार्जनाचा समारोप करून शिष्य स्वगृही परतणार होते . ज्ञानी , अनेक प्रकारचे विषय आत्मसात केलेले , अनेक विद्यार्थी दीक्षादान समारोहात श्रेष्ठ शिष्याची उपाधी मिळविण्यासाठी तत्पर झाले. अग्रक्रमी असणाऱ्या