निरपेक्ष प्रेम...

  • 7.3k
  • 1
  • 1.9k

पाऊस धो धो कोसळत होता.वीजांच्या लखलखाटाने काही काळापुरता उजेड पडून काळ्याकुट्ट काळोखात एक आशेची ज्योत तेवत असल्याचा भास होत होता.चारी बाजूने ढग जमा होऊन आले होते. अंधार तर एवढा दाटला होता की कोणी समोरून डोळ्यांत बोट जरी घातले तरी जाणीव होणार नाही.पावसाच्या टपोऱ्या थेंबानी धरती अगदी हर्षोन्मलीत झाली होती.जणू ते मोत्यासमान थेंब तीच्या कायेवर बरसून आपल्या आगमनाची वार्ता देत होते. सोसाट्याच्या वाऱ्याने हाच आपला शेवटचा प्रयत्न आहे समजून या जीवसृष्टीवर उच्छाद मांडून हाहाकार माजवला होता.त्या जीवघेण्या परिस्थितीत ही उन्मळून न पडता आपले अस्तीत्व टिकवून ठेवण्याचा प्राणपणाने प्रयत्न करणाऱ्या वृक्षांच्या हिरव्यागर्द पर्णांची सळसळ त्या भयाण शांततेत ही भयप्रद वाटत होती. ढगांच्या