रुद्राक्ष एकटक मावळत्या सूर्याकडे पाहत समुद्रकिनारी उभा होता. किती वेळ तो तसाच उभा असेल कोणास ठाऊक !अचानक बॉल लागल्या ने त्याची तंद्री तुडते . "सॉरी" ...... दादा चुकून बॉल लागला . जास्त जोरात नाही ना लागलं .... खरंच सॉरी रुद्राक्ष बॉल उचलत हसत "नाही लागल मला " हा घे बॉल आणि सावकाश खेळा , लागेल नाही तर . "हो "... तो मुलगा हसत बोलतो आणि बॉल घेऊन पाळायला लागतो . रुद्राक्ष त्या मुलाकडे पाहत असतो . सहज त्याच लक्ष्य समोर गेलं तर एक मुलगी वाळूचा किल्ला बनवत होती . थोडी ओळखीची वाटली म्हणून रुद्राक्ष थोडा पुढे जाऊन निरखून पाहतो आणि तो एकटक पाहतचं राहतो