बळी - १२

  • 11.5k
  • 6.3k

बळी- १२ मीराताई द्विधा मनःस्थितीत होत्या. रंजनाने केदारच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं खरं; पण त्यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सिद्धेश केदारचा जवळचा मित्र होता. घडलेला सगळा प्रकार मीराताईंनी त्याला सांगितला होता. फक्त रंजनाचे दागिने घरातून गायब झाले होते; हे मात्र त्याला माहीत नव्हतं. त्या स्वतःशी विचार करत असत, -- " जर केदारचं खरोखरच काही प्रेमप्रकरण असेल, तर सिद्धेशला नक्कीच माहीत असेल;" आणि त्याला परत-परत विचारत