नगीबाचा माळ

  • 4.1k
  • 1.4k

सचिनला शेतीची आणी गुराढोरांची लहाणपणापासूनच खूप आवड होती. तो अभ्यास करत करत शेतीच्या कामात आई-वडीलांना मदत करायचा. जनावरे चारायला नेणे हे तर त्याच्या आवडीचे काम. पण गेल्या एक वर्षापासून तो त्याच्या आवडीच्या कामापासून दूर गेला होता. कारण गेल्या वर्षीच त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून रायगड जिल्हयात नियुक्ती झाली होती. यंदा तो दिवाळीच्या सुट्टयात गावी आला होता. यावर्षी पाऊसकाळही चांगला झाला होता. त्यामुळे विहीरी, तलाव तुडुंब भरले होते. नद्या-नाल्या, ओढे खळाळून वाहत होते. जनावरांना मुबलक चारा होता. आज सकाळीच त्यानं न्याहरी केली आणी आईनं चिरगुटात बांधून दिलेली भाकरी अन् एक स्टीलचा डबा घेवून तो गोठयाकडे आला.