स्थित्यंतर - भाग1

  • 8.1k
  • 2.8k

उंचच उंच झोके घेत असताना अचानक कोणी आडवे यावे याशिवाय मोठा विचका तो कोणता? अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर एखादं लहान मूल मिटक्या मारत कुल्फी खात असावं आणि अचानक ते खाली पडावं असेच काहीसेसावी चे झाले होते. सावी….आपल्या आईच्या उदरात वाढत असलेली निरागस मुलगी.एक समाधिस्त,संन्यस्त अतिउच्च कोटीतील मनुष्य जर कुठे खरा भेटत असेल तर तो आईच्या उदरातच.या जीवाला बाहेरच्या जगाशी काही-काही घेणं देणं नसतं. सभोवताली आईच्या उदराचे अंतराळ,असंख्य पेशा म्हणजे त्यातील तारका आणि या सगळ्यांचा सूर्य म्हणजे खुद्द आई.सजीव-निर्जीव या संवेदना देखील जाणवू नयेत इतकं शांत आणि सुरक्षित ते जग,त्या जीवाला मग चांगले-वाईट,छळ-कपट गरीब-श्रीमंत गावीही नसतात.असंख्य भावनांच्या समिधा पडतात तेव्हा