मग मी करू कां ट्राय उडण्याची आता... वैजंता हसत बोलली. हे बघ वैजंता हे हसण्यावर नेऊ नकोस. हे मी खोटं नाही सांगत. जरा आजमावून बघ .हा वरचा तुझा ड्रेस काढ आणि त्या सूटवर तू रहा.मग दोन्ही हात हवेत पसरून उडण्याचा प्रयत्न कर .मग तुला वेगळा अनुभव येईल. बरं बरं असं म्हणून वैजंता तिच्या अंगावरचा ड्रेस बाजूला करू लागली. इतक्यात लैलाच्या घराची बेल वाजली. कोण आला असेल .वैजंता बोलली. काय माहीत कदाचीत माझ्यावर प्रेम करणारा कुणीतरी असेल. म्हणजे कळलं नाही मला. आहे एकजण माझ्यावर एकतर्फी प्रेम करतो. तू ओळखतेस त्याला... ठीक आहे मी घेते त्याला आत बघ तू ओळखतेस कां त्याला..