बटरफ्लाय वूमन - भाग ३

  • 6.6k
  • 2.8k

सकाळी ती त्या सूटची गोष्ट विसरूनच गेली होती. भराभर कामे आटोपून वैजंता कामाला जायला निघाली. तिने दरवाजा उघडला आणि दरवाजा समोर एक महिला इन्स्पेक्टरला बघून ती चक्रावून गेली.मी इन्स्पेक्टर चैतन्या पवार.. ती महिला इन्स्पेक्टर बोलली. तुम्ही वैजंता चांदे.होय मीच वैजंता चांदे...आत येऊ कां? इन्स्पेक्टर चैतन्या बोलली.हो हो यांना आतमध्ये तीने चैतन्या इन्स्पेक्टरला रूम मध्ये घेतले. आतमध्ये शिरल्यावर चैतन्या इंस्पेक्टरने तिची खोली नीटपणे न्याहाळली. तिची नजर त्या सूट कडे वळली. मात्र इन्स्पेक्टर चैतन्या एका खुर्चीत बसली.महिला इन्स्पेक्टर सोबत आणखीन एक महिला पोलीस होती. त्या दोघींना वैजंताने पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर चैतन्या इन्स्पेक्टर बोलली.वैजंता चांदे.... मी तुझ्याकडे एका चौकशीसाठी आलेय. मला