बटरफ्लाय वूमन - भाग 6

  • 6.7k
  • 2.4k

अचानक रोबोट कीटक यायचे बंद झाले.याचा अर्थ काजव्याच्या टीमने त्यांच्या रोबोट राणीच्या किंवा रोबोट राजाचा खात्मा केला असावा. असा अंदाज वैजंता आणि लैलाने बांधला. त्या दोघी त्वेषाने लढत होत्या. वैजंता आणि लैला लढून लढून दमल्या होत्या. विलास हेलिकॉप्टर बनून त्याच्या अवाढव्य मशीनगन मधून गोळ्यांचा वर्षाव करीत होता.मात्र त्यांच्या मशीनगनचा आवाज येत नव्हता किंवा रोबोटचा सुद्धा आवाज येत नव्हता.त्यामुळे नागरी वस्तीत युद्ध चालू असताना आप आपल्या घरांमध्ये झोपलेल्या लोकांना त्यांचा जराही उपद्रव होत नव्हता.सायलेन्सर लावलेली साऊंडप्रूफ मशीनगन त्याची असावी असे वाटत होते .परंतु ते तसे नव्हते. त्याची मशीनगन विशिष्ट प्रकारची होती. एका विशिष्ट पदार्थापासून तयार केलेली. सोबतच मशीनगन मधून निर्माण होणाऱ्या