विस्मरणाचे फायदे

  • 9.5k
  • 2
  • 2.8k

एका स्व रचित रूपक कथेवरून एक व्यापक मानस शास्त्रीय संकल्पना स्पष्ट होईल .तिन्ही सांजेची वेळ. एका मोठया खडकाआड एक 20/25वर्षांचा तरुण लपला होता .कधी एकदा रात्र होईल आणि जंगलातून वाट काढत पलीकडच्या गावात शिरेन, असा विचार करत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र भावाने त्याच्या वाटणीची जमीन हडप करून उलट ,त्या तरुणावर खोटा आरोप घेऊन गावाबाहेर हाकलून दिलेले होते. त्याचा बदला घ्यावा म्हणून तो दबा धरून बसलेला होता. त्या खडकापलीकडे दूर एक वाडा होता. त्या वाड्याबाहेर उन्हात एक छोटा मुलगा ,9/10 वर्षांचा , त्याच्या छोटया हाताने लाकडांच्या मोळया बांधण्याचे काम करत होता .थकला होता . कदाचित दुपारपासून हे काम करत