सुंदर डोळे सकाळचे नऊ वाजले होते. गणेशला महत्वाच्या कामासाठी बीडहून पुण्याला जायचे होते. तो गडबडीने बसस्थानकात आला. योगायोगाने बीड-पुणे बस उभीच होती. सुदैवानं गर्दीपण नव्हती. वाहकाच्या मागील दोन सिट सोडून तो खिडकीच्या कडेला बसला. चालक व वाहक गाडीमध्ये नव्हते. बहुतेक ते नाश्त्यासाठी कँटीनला गेले होते. हळुहळु माणसं गाडीमध्ये येत होती. दहा-पंधरा मिनीटानंतर चालक व वाहक आले, बस सुरु झाली. बसस्थानकाच्या बाहेर निघताना कोणीतरी हात केल्याने बस थांबली. गणेशने खिडकीमधून दरवाज्याकडे पाहिले. एक पंजाबी ड्रेस मधील कमनीय बांध्याची,चेहऱ्याला स्कार्फ बांधलेली मुलगी लगबगीने बसमध्ये चढली. तिनं आतमध्ये येताच रिकामी जागा शोधण्यासाठी नजर फिरवली. तिची आणी गणेशची नजरानजर झाली. तेव्हा तिच्या डोळयात