आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून. मी फेरीवाल्यांना भाव विचारला. दिवसाचे २ तास, नाहीतर आठवड्याचे १५