पैसा

  • 8.3k
  • 1
  • 2.4k

पैसा मावसभाऊ व सद्या वन अधिकारी असलेल्या नागेशचे लग्न असल्यामुळे मालकाकडून सुट्टी घेवून गणेश आज लग्नासाठी निघाला होता.त्याचे म्हातारे आई-वडील दोघेही कालच पाहुण्याच्या घरी मुक्कामाला गेले होते. त्याला खरं तर पैशांच्या अडचणीमुळे लग्नाला जायचे नव्हते. पण नागेशने खूप वेळा फोन करून आग्रह केल्यामुळे त्याला लग्नाला जाणे भागच पडले. त्याने आपला जवळचा मित्र सचिनकडून उसने पैसे घेवून आई-वडीलांना जाण्या-येण्यासाठी पैसे देवून स्वत:ला ड्रेस व ‍ नविन चप्पल विकत घेतली होती. आता त्याच्या जवळ फक्त तिकीटाचे येण्या जाण्याचे पैसे होते.तो लग्नस्थळाजवळ आला. लग्न एका मोठया मंगल कार्यालयामध्ये होतं. तो आपल्या आई-वडीलांना शोधून त्यांच्याजवळ गेला.