आई वैभवची नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती.उन्हाळयाच्या सुट्टया असल्याने तो दिवसभर मित्रांसोबत घराजवळयाच्या पिंपळाच्या झाडाच्या थंडगार सावलीमध्ये कॅरम खेळत बसायचा. किंवा क्रिकेट खेळायला जायचा. खेळण्यापुढे त्याला भुक लागलेली सुद्धा जाणवत नव्हती. त्याची आई त्याला जेवायला चल म्हणून थकून जायची. तरी तो जेवायलाही जायचा नाही. त्याचा दिवस-दिवस फक्त खेळण्यामध्ये जायचा.झोपेतही त्याला फक्त कॅरम व क्रिकेटचं दिसायचा. बारावीच्या परीक्षा पुर्वी त्याने खूप अभ्यास केला होता.त्यामुळे त्याच्या आईला वाटायचे सुट्टया आहेत तोवर खेळेल नंतर निकाल लागल्यावर परत अभ्यासात गुंतून जाईल.नंतर कुठे खेळायला वेळ भेटेल त्यामुळे ती काही बोलत नव्हती. पण आता त्याचे कॅरम खेळणे प्रमाणापेक्षा जास्त झाले होते. एके दिवशी त्याचे वडील सुट्टी