श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 2

  • 6.3k
  • 3.7k

साधुसंत वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल कधी नाराजी करत नाहीत. त्यांना मिळालेले जीवन दयाळू विठ्ठलाची कृपा आहे अशी त्यांची धारणा असते. स्वतःची प्रत्येक कृती ही विठ्ठलाच्या रूपाने होत असते ती अशी साधुसंतांची दृढ श्रद्धा असते. जे आपल्याला मिळाले त्यात आपण समाधानी असावे. दुःखी गोष्टीचे बाऊ करत बसू नये .आयुष्यातील आनंदसुख हेच सत्य आहे असे समजावे ही शिकवण श्री विठ्ठलाने संत साधुसंतांच्या मार्फत समाजांमध्ये दिली. संत तुकारामांचे आजोबा कन्हैया होते. त्यांचे वडील बोल्होबा होते. संत तुकारामाचा पिंड व्यापाऱ्याचा नव्हता. तर विठ्ठल भक्तीचा होता. हा त्यांचा स्वभाव होता. नामाचे स्मरण ही त्यांची सेवा होती. संत तुकारामांचे स्वतःचे दुकान होते. ते स्वतः दुकान