श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 6

  • 5.3k
  • 2.2k

सत्संग शक्ती समाजाचा आत्मा आहे. समाजाची प्रगती समाजाची विकास समाजाची स्थिती हे सर्व संतमंडळी वर अवलंबून असते. संतांचा सत्संग केल्याशिवाय आत्मानंद मिळणे शक्य नसते. संतांच्या आचरणाने निर्भेळ आनंदाचा समाज आस्वाद घेतो. भागवत धर्माच्या म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या पांडुरंग किंवा श्री विठ्ठल सर्वांना एकत्र करून मार्गदर्शन करतो. संत, भक्त, विठ्ठल नामाचे नामस्मरण करून भजन ,पूजन ,कीर्तन ,प्रवचन करून त्याची प्रार्थना करतात . त्याला मनापासून सामुहिकपणे आळवतात . संत सेना महाराज हे बांधवगडचे होते .बांधवगड मध्य प्रदेशामध्ये आहे. तिथल्या एका किल्ल्यावर सेना महाराजांचे वडील नोकरी करीत. वडील देविदास आणि आई प्रेम कुंवर बाई होती. सेना महाराजांचे गुरू आचार्य रामानंद