दिवाना दिल खो गया (भाग ४)

  • 7.1k
  • 2.7k

सिलूचे हे पुढचे चार दिवस भलतेच व्यस्त जाणार होते. त्याला त्याच्या बॅगेत सध्या तरी गरजेचे सर्व सामान भरणे आवश्यक होते. कारण कंपनी पॉलिसीनुसार पुढचे २ वर्ष तरी सिलूला भारतात येता येणार नव्हते आणि तशीच काही एमर्जन्सि आली तर त्याला स्वत:च्या खर्चाने येण्या-जाण्याचा प्रवास करावा लागणार होता. आज त्याचे मामा-मामी त्याला शुभेच्छा द्यायला घरी आले होते. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. जेवण आटोपल्यावर सगळे गप्पागोष्टी करायला बसले. थोडावेळ झाल्यावर सिलूने मामा-मामीचा आशीर्वाद घेऊन त्यांचा निरोप घेतला आणि मग तो त्याच्या खोलीत आराम करायला गेला. त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि मेसेज बॉक्स ओपन केला व तो मुग्धाबरोबर केलेला पहिला