दिवाना दिल खो गया (भाग ८)

  • 7.4k
  • 3k

(सिलू एक शांत, संस्कारी आणि सुस्वभावी मुलगा होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा होता तो. मग रोजेला हिला तर सिलूचा एक महिन्याचा सहवास मिळाला होता. तर मग ती सिलूच्या प्रेमात नाही पडणार असे कसे बारे नाही होणार!! आता पुढे..) सिलू दिवसरात्र त्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे होता. त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. रोजेला कामाबरोबर सिलूच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देत होती. तिला माहीत होते की, सिलूचे मुग्धावर खूप जास्त प्रेम आहे आणि आता एक आठवड्यानंतर सिलूला पुन्हा कधी भेटता येईल ह्याची तिला शाश्वती नव्हती. पण रोजेला मनातल्या मनात सिलूवर प्रेम करायला लागली होती. तिला सिलूचा सहवास हवाहवासा वाटत होता. रोजेला इतकी