गावा गावाची आशा - भाग 3

  • 6.7k
  • 2.7k

प्राथमिक आरोग्य केंद्रातून पूजाआशा सेविकेला फोन आला होता. डॉक्टर कैलाश यांनी तिला दवाखान्यातून मेडिसिन घेऊन जायला सांगितले होते. म्हणून ती औषध घ्यायला दवाखान्यात गेली. दवाखान्यात कैलास डॉक्टरांना भेटल्यावर डॉक्टरांनी तिला औषध निर्माता यांना भेटायला सांगितले. ती त्याप्रमाणे औषध निर्माता रवींद्रना भेटली. रवींद्र सरांनी तिला काही औषधे दिली.तेव्हा दवाखान्याची ' एल एच वी 'जयंती मॅडम जवळ आल्या आणि म्हणाल्या. पूजा छान काम करतेस तू .तुला यावर्षीचा उत्तम कामाचा आदर्श आशा पुरस्कार मिळायला हवा. जयंती मॅडमने असे म्हणल्यामुळे पूजाला खूपच हूरूप आला होता.प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शिपायाने सुद्धा तीची चौकशी केली. ती सर्वांशी मिळून मिसळून वागत होती. काही काही आशांच्या स्वतंत्र स्टाईल असतात. मात्र