बळी - १८

  • 9.9k
  • 5.5k

बळी - १८ काय खरं-- काय खोटं; हे केदारला कळत नव्हतं. तो बराच वेळ डोकं धरून बसला होता -- विचार करत होता, "सहा महिन्यांपूर्वी मी रंजनाबरोबर सिनेमाला निघालो होतो? हे कसं शक्य आहे?" पण नंतर त्याचं मन त्याला सांगू लागलं,"ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं माझ्याशी नक्कीच खोटं बोलणार नाहीत.--- पण हा सहा महिन्याचा घोळ काय आहे? मला नक्की