रहस्यमय जागा - भाग 2

  • 6.8k
  • 3.2k

रहस्यमय जागा भाग 2 - रहस्याच्या जवळ ----------------------------------------------------------- विराटची गाडी एका मोठ्या हायवेवरून धावत होती. हलका हलका पाऊसही सुरू झाला होता. विराटने प्रशांतकडे एक नजर टाकली. त्याची नजर खिडकीबाहेर होती. मनात नक्कीच आजोबांचे विचार सुरू असणार. " मला वाटत , आपण कुठे तरी थांबायला हवं , काही खाल्लं पण नाही सकाळपासून. " विराट बोलल्यावर प्रशांत तंद्रीतून बाहेर आला. विराटला भुकेची जाणीव होऊन झाली होती. त्याला इतक्या वेळ ड्राईव्ह करायची सवयही नव्हती. दोन तासांपासून सलग गाडी चालवून त्याला कंटाळा आला होता. प्रशांतने तो काय बोलला काही ऐकले नव्हते. विराटच्या लक्षात येताच त्याने