मीरा का मोहन - एक विधिलिखत प्रेमकहाणी

  • 7.8k
  • 2.7k

मीरा आज खूप आनंदी होती... त्याला कारणही तसेच होत. २०-२२ वर्षे बंद पडलेला त्यांच्या कुलदेवतेचा देवीचा गोंधळ यावर्षी पुन्हा सुरु होणार होता.लहानपणापासून कोकणात वाढलेली हि मीरा गावडे, अवघी तीन वर्षाची असताना मालतीताईंसोबत (मीराची आई) मुंबईला आली. मधुकरराव गावडे (मीराचे बाबा) मुंबईतच एका मिलमध्ये काम करत होते. आपल्या तुटपुंज्या पगारातून त्यांनी एक छोटीशी झोपडी वजा खोली विकत घेतली होती आणि आता त्यातच त्या राजाराणीचा संसार सुरु झाला होता.चांगल्या संस्कारात वाढलेली मीरा ह्या मुंबईच्या वातावरणात सहज मिसळून गेली. आणि तिच्या गोड आणि बोलघेवड्या स्वभावामुळे सर्व शेजारी तिच्यावर मुलीसारखे प्रेम करीत होते. आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर मीराला तिथल्याच एका चांगल्या शाळेत ऍडमिशन देखील मिळालं.