पुढे.... माझ्या मनातली उलथापालथ मी कुण्णाला काय कुण्णालाच सांगू शकत नव्हती...एक तर ते वय असं होतं की कुणी समजून घेईल याची शाश्वती नव्हती...ताईला किंवा घरी सांगणं तर अशक्यच..!! आणि मैत्रिणींना सांगणं म्हणजे या ' आ बैल मुझे मार ' ही गत झाली असती...त्यांनी चिडवून चिडवूनच जीव घेतला असता...आणि ज्याला सांगावं वाटत होतं त्याला सांगायची हिम्मत होत नव्हती... सांगणं तर दूर त्या प्रसंगानंतर माझी अतुल कडे बघायची हिम्मत होत नव्हती...शेवटपर्यंत त्याला जे सांगायचं होतं ते बोलूच शकली नाही..हां, तो मात्र शेवटच्या भेटीला असं काही बोलून गेला की ते बाणासारखं टोचलं मला...काय बोलला होता तो..अम्म्मम.. हां.. आठवलं... बिछड के फिर मिलेंगे कितना