बळी - १९

  • 10.5k
  • 5.3k

बळी -१९ रंजनाने आपल्या घराविषयी कोणतीही माहिती त्या गुंडांना दिली नाही; हे ठासून सांगताना केदार इन्सपेक्टर साहेबांवर चिडला होता. रंजनाविषयी त्याच्या मनात खूपच विश्वास होता! तिला कोणी काही बोललेलं त्याला सहन होत नव्हतं.केदार हट्टी स्वरात पुढे बोलू लागला,"रंजना जरी फार शिकलेली नसली तरीही खुप स्मार्ट आहे! तिने अनोळखी व्यक्तीला अशी माहिती कधीच दिली नसती! त्यांच्या गप्पा त्यांच्या गावपर्यंत मर्यादित होत्या! त्याच्याशी