आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - २

  • 8.2k
  • 3.8k

रात्रीचे आठ वाजले होते. काळजीने आईने निशिकांतला फोन केला. तेंव्हा निशिकांत विचारांतून बाहेर आला,आणि घरी निघाला. पण जुईचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हता. घरी पोहोचल्यावर आईने काळजीने विचारले कुठे होतास? जेवायच नाही का? यावर तो इतकंच उत्तरला की इथेच होतो . भूक नाही. आणि त्याच्या रूम मध्ये गेला. पण खूप अस्वस्थ होता कारण त्याला कारणच माहीत नव्हत जुई च्या अचानक निघून जाण्याच. त्याने जुईला कॉल केला अगदी जसा रोज करतो तसाच, आणि घडलेही नेहेमीप्रमाणे कॉल रिसिव्ह नाही केला गेला. नाराज झालेला निशिकांत गादीवर निपचित पडून राहिला आणि डोळ्यातील आसवाना वाट करून देत भूतकाळात रमला. आजही त्याला