दिलदार कजरी - 7

  • 5.4k
  • 1.9k

७. लेखन वाचन मास्तरांचे शिकवणे सुरू झाले. दोन गोष्टी .. एक अक्षर ओळख, आकडे, लिहिणे वाचणे आणि दुसरे.. सायकल चालवणे. घोडा दौडवणे कठीण नसेल पण दुचाकी सायकलीवर तोल सांभाळत ती चालवणे मात्र कठीण. आपल्या हातातील लगामाने सारे काही कंट्रोल करण्याची सवय डाकूलोकांना. अगदी जिभेच्या लगामापासून सुरूवात. आजूबाजूच्या गावांवर दहशतीचा लगाम लावूनच इतकी वर्षे टोळी पोलिसांपासून बचावली होती. घोड्याचा लगाम म्हणजे त्या जंगलातील आयुष्याचे प्रतीक होते जणू. आणि दिलदार शिकतोय या सायकलीला तर असा लगामच नव्हता! ब्रेक मारला की थांबते ती सायकल, पण लगामासारखी 'मर्दानी' मानावी अशी गोष्टच सायकलीत नाही. टोळीत होणाऱ्या बदलाचे तर संकेत नव्हते हे? दिलदार विद्यार्थी म्हणून तसा