दिलदार कजरी - 9

  • 6k
  • 1
  • 2.4k

९. पाऊल पडेल का पुढे? दिलदार परतला. समशेर त्याची जणू वाटच पाहात होता. नाही म्हटले तरी समशेरला या प्रेमकहाणीत तसा रस वाटायला लागला होता. नेहमीच्या मारधाडीपेक्षा हे अधिक रम्य वाटायला लागले होते. दिलदारच्या दिलाची हाक नि भूक अशी गोड वाटेवर घेऊन जाणारी असेल तर हे दरोडेखोरीचे आयुष्य म्हणजे फुकट.. दिलदारच्या प्रयत्नात एक काव्य आहे. एक नाजूक भावना आहे. भले त्याचे ते स्वप्न पूर्ण होईल किंवा न होईल.. पण ती वाट वेगळी आहे. बंदुकीच्या दस्त्याहून गुलाबाच्या पाकळ्यांत जास्त ताकद आहे की काय? गुरूजींना पळवून आणले ते ही प्रेमाने बोलत होते.. त्यांना या बंदुकीच्या गोळ्यांची गरज भासत नव्हती. आणि गावातील लोक? ते