दिलदार कजरी - 15

  • 5.8k
  • 1
  • 2.5k

१५ भेट पहिली खडकाखाली रात्रभर दिलदार तळमळत राहिला. बाकी टोळी कुठेतरी धाड घालायला निघून गेलेली. संतोकसिंग नव्हता तरीही बाकीचे सारे व्यवस्थित सारे पार पाडतं. संतोकसिंगच्या नेतृत्व गुणांचेच त्यातून दर्शन होत होते.व्यवस्थित लावून दिलेली शिस्त आणि टोळीची उद्दिष्टे अतिशय सुस्पष्ट असणे.. दयामाया या शब्दांना जवळ फिरकू न देणे वगैरे त्याची मूलभूत तत्वे सारेच टोळीकर कोळून प्यायले होते. सारे त्या मार्गावरून टोळीची दहशत बसवत टोळीची बरकत वाढवीत होते, तेव्हा दिलदार त्यावर हरकत घेत आपल्या दिलाची पुकार ऐकत बसलेला. त्यात आता कजरीची पडलेली भर. कजरीच्या भेटीनंतर दिलदार अजूनच सैरभैर झाला. तिला जेव्हा दिलदारच्या मुळाबद्दल कळेल तेव्हा काय होईल? दिलदार खूप विचारात पडला. समशेर