दिलदार कजरी - 16

  • 6.7k
  • 1
  • 2.3k

१६ हरिनाथ मास्तरांची भेट आपल्या तंबूत दिलदार पोहोचला. सारा वृत्तांत समशेरच्या कानी घातला तेव्हा दिलदारला थोडे हलके वाटायला लागले. दोघांची गहन खलबतं झाली. त्या दिवशी रात्री कजरीच्या गावात घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. सारी घरे आतून कड्याकोयंडे लावून चिडीचुप्प झाली. फक्त वाड्याच्या माडीवरून एका कवाडाला किलकिले करून कजरी पाहात होती. दोन घोड्यांवरून दोन जण चाललेले.. तिचा अंदाज खरा होता. त्यातील एक तोच पोस्टमन होता.. घोड्यावरून स्वार दिलदार विचारात पडलेला.. गुरूजी कजरीला काय सांगतील? पोस्टमन नि दिलदार .. दोघांबद्दल. आणि अजून काही.. त्यांना पळवून नेले त्याबद्दल .. पण आता इलाज नव्हता. जे जे होईल ते ते पहावे म्हणत दिलदार घोडा हाकीत होता.