२०. ये मेरा प्रेमपत्र.. प्रेमपत्र म्हटले की त्याचा एक साचा असतो. तीच प्रेमाची गोड गुलाबी भाषा, प्राणसखा नि प्राणप्रिये.. जिवलग आणि जिवलगे.. ह्रदयाची धडकन नि काळजाची धडपड असले काही नि अजून काही नाही. त्यात सध्या झुरणे किती जोरात सुरू आहे याचे शाब्दिक चित्रण नि एखाद्या राजकीय नेत्यानेच दाखवावीत अशी भावी सुखी आयुष्याची सत्तर एम एम ची डाॅल्बी साउंड फिल्मची स्वप्ने! प्रत्येक नवथर नि नवोढ युगुलाला ते नवे नवे नि हवे हवे वाटते. आजवर असली दिव्य प्रीती कुणी न केली न कोणी या पुढे करेल यावर त्यांचा गाढ विश्वास असतो. पहिल्या प्रेमाला प्रेमपत्रातच प्रेमाचे कढ नि प्रेमाच्या उकळ्या फुटून ते प्रेम