पुढे... काही भावना अश्या असतात ज्यांना आपण ओळख आणि नाव दोन्ही ही देऊ शकत नाही... त्या शेवटपर्यंत तश्याच राहून जातात...दबलेल्या... आता बघा ना, त्यादिवशी अचानक अतुलला काय झालं काय माहित आणि तो लगेच निघून गेला... मला माझ्या मनात काय चाललंय हे जाणवत होतं पण ते नक्की आहे काय हे ओळखता येत नव्हतं...आणि तसंच काहीसं अतुलच्या बाबतीतही होत असावं...आता विचार केला तर वाटतं की त्या वयात घडतं असं, अचानक कोणीतरी वाटायला लागतं 'खास'...पण मला त्या वयातही आणि आताही का तोच एक 'खास' वाटतो??? काय म्हणावं याला?? हं...बोलली ना, काही भावनांना नाव आणि ओळख नाही देऊ शकत.. चेतनला येऊन आठवडा झाला होता...आता