दिवाना दिल खो गया (भाग १०)

  • 7.6k
  • 3k

(साहीलने आधी डॉक्टरांना फोन करून सिलूचा पत्ता दिला आणि मग लगेच मुग्धाला फोन करून सद्यपरिस्थिती सांगितली. मुग्धाला हे कळताच कसलाही विचार न करता ती तडक सिलूच्या घरी पोहोचली.) आता पुढे..... साहीलने अम्माला फोन करून सांगितले की, “आंटी, मी एका महत्वाच्या कामात अडकलो आहे आणि मला पोहोचायला उशीर होईल त्यामुळे सिलूची ऑफिस मधली सहकारी डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचेल. तिचे नाव मुग्धा आहे.” असे म्हणून त्याने फोन ठेवला व मुग्धाला ही ह्याची कल्पना दिली. तसेच मुग्धाला डॉक्टरांचा नंबर देऊन कॉनटॅक्ट करायला सांगितला. काहीवेळातच मुग्धा सिलूच्या घरी डॉक्टरांना घेऊन पोहोचली. मुग्धाने दारावरची बेल वाजविली. अम्माने दरवाजा उघडला. तेव्हा मुग्धा पटकन बोलली, “अम्मा मी