आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ५

  • 8.1k
  • 2
  • 3.6k

संध्याकाळी घरी आल्यावर निशिकांतने जयला कॉल केला पण त्याचा कॉल निशिकांतला आउटऑफ लागला. त्यामुळे त्याने आईला विचारल, "आई अगं दादाचा फोन आउटऑफ का?" आईने उत्तर दिलं,"अरे चार दिवस तो नसेल कनेक्शन मध्ये कसली तरी कॉन्फिडेंशियल मीटिंग आहे म्हणाला." निशिकांत मग स्वत:च्या रूम मध्ये निघून गेला. पुस्तक घेण्यासाठी जेंव्हा तो टेबलकडे वळला तेंव्हा त्याला पुस्तकांखाली जुईचा फोटो दिसला. त्याच्या लक्षात आल की आईनेच हा फोटो इथे ठेवला असणार. त्याने सहज म्हणून जुईचं फेसबुक अकाऊंट शोधायचा विचार केला. आणि लॅपटॉप उघडला. तो जुई गेल्यापासून कुठेच socially active नव्हता. आज त्याने इतक्या दिवसानंतर फेसबुक उघडल्यामुळे त्याला खूप सारे मेसेजेस दिसले.