पुढे... मानवी मन किती अतर्क्य आणि अजब आहे ना??? म्हणजे जर सगळं आपल्या मनाप्रमाणे होत असेल तर ठीक, नाहीतर कुठे जरी थोडी विसंगती आढळली तर मनाला वाटेल ते निष्कर्ष काढून मोकळा होतो...खूप वेळा तर असं होतं की, आपण जे डोळ्याने पाहतो, किंवा कानाने ऐकतो ते तसं नसतंच.. हकीकत वेगळीच असते.. पण तेच आहे ना, आपण ज्या नजरेने त्या गोष्टी कडे पाहणार आपल्याला समोरची गोष्ट तशीच दिसणार... अश्यावेळी कोणत्याही तर्क वितर्कावर न जाता स्पष्ट बोलून मोकळं व्हावं म्हणजे पुढचे गैरसमज टळतात... पण हेच नाही जमलं ना..मलाही आणि अतुललाही...आम्ही दोघेही फक्त लाटा येतील तसं वाहवत होतो पण थोडा विसावा घेऊन त्यावर विचार