पुढे... प्रत्येकच गोष्ट लपवता येते का?? मनात दाबून ठेवता येते का?? माहीत नाही...पण ज्या खऱ्या भावना असतात त्या मात्र आपल्याला धोका देऊन चेहऱ्यावर त्यांचे रंग सोडूनच जातात...मग आपण कितीही प्रयत्न केले खोटं बोलण्याचे तरी ओठांची भाषा आणि डोळ्यांची भाषा जुळतच नाही...मनातले सगळे भाव डोळ्यांत उतरतात आणि मग डोळे मात्र शब्दांची साथ सोडतात...असंच काहीसं माझ्या आणि अतुलच्या बाबतीत होत होतं...जे चेहऱ्यावर झळकत होतं ते लपवण्याचा अतोनात प्रयत्न करत होतो आम्ही...आणि त्यातल्या त्यात मी तर सगळं काही मनात अगदी तळाशी गाडून ठेवण्याचा प्रयत्न करायची, कारण भीती वाटायची जर चुकून माझ्याकडून काही चुकीचं झालं किंवा चुकीचं बोलल्या गेलं अतुल समोर तर आमच्या मधात