मन करारे प्रसन्न

  • 7.4k
  • 2
  • 2.1k

मन करारे प्रसन्न रात्रीचे जेवण करून मी नुकताच बेडरुममध्ये येवून बसलो होतो. तेवढयात माझ्या इंद्रजीत नावाच्या पुण्याच्या एका मोठया व्यापारी मित्राचा मला अचानक फोन आला. मी फोन उचलून, " बोल इंद्रजीत ! आज खूप दिवसांनी आठवण काढली." "आठवण काढली नाही. तर तुझीच आठवण आली. कारण मी काही दिवसांपासून निराशेच्या गर्तेत कुठेतरी खूप खोलवर अडकलो आहे. आणि मला माहित आहे.तुच यामधून मला बाहेर काढू शकतोस." त्याच्या या बोलण्यानं क्षणभर मलाच काही सुचले नाही. कारण तो एक तर खूप मोठा ‍बिजनेसमॅन होता. त्याला पैशांची चिंता नव्हती.त्याची पत्नीही खूप सुंदर होती. तो नेहमी म्हणायचा, माझे भाग्य आहे की