पुढे... आपण मैत्री कितीही लोकांशी वाटू शकतो,पण प्रेमात वाटा पडलेला नको असतो आपल्याला...म्हणजे कसं आहे ना, आपण प्रेमात असलो की आपल्याला वाटतं, की त्या खास व्यक्तीने केवळ आपल्यालाच महत्त्व द्यावं... सतत आपल्याच आजूबाजूला असावं, त्याला केवळ आपलाच ध्यास असावा...आणि हे का वाटतं? कारण प्रेम आपल्या मनात संचारलेलं असतं..पण प्रेम समजून घेण्यासाठी ते केवळ मनात रुजवून चालत नाही तर त्याची समज ही असावी लागते...आणि ही समज केंव्हा येते?? जेंव्हा आपण आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ तेंव्हा...कधी कधी भावना प्रकट करायला शब्दही अपुरे पडतात, तर कधी कधी ते बोलण्याचं धाडस होत नाही...आणि खूप वेळा तर आपण स्वतःच्या मनानेच काहीही गृहीत धरून