श्वास असेपर्यंत - भाग ८

  • 5.5k
  • 2.2k

सुट्टीच्या दिवसात मग नेमकं काय करायचं त्यात काही गावातील मित्र मला चिडवत असायचे. त्यातील रमेश, बाबाराव यांच्याशी चांगलीच गट्टी असल्याने ते नेहमी म्हणायचे , " अमर आता शहरात जाऊन मोठा साहेब होईल. मोठं घर बनवणार. नवीन - नवीन कपडे घालणार, अशा गोष्टी करून मला चीडवत असायचे . पण मला त्यांचा स्वभाव माहिती होता. ते नेहमी गंमत करत असायचे. घरच्या बकऱ्या झिंगरी,बिजली आता म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांच्यापासून बराचं मोठा वृक्ष तयार झालेला होता. तिचा पिल्लांपासून बरेचदा आम्हांला आर्थिक मदतही झाली होती . मी सुट्टीच्या दिवसांत बकऱ्या चारावयास रानात घेऊन जात असायचो. इकडे- तिकडे हिंडायचं.