दिवाना दिल खो गया (भाग १३)

  • 7.6k
  • 1
  • 3.1k

(सिलूला तर त्याच्या कानांवर विश्वास होत नव्हता. इतक्या सहजासहजी अम्मा मुग्धाला अॅक्सेप्ट करेल असे सिलूला कधीच वाटले नव्हते. त्याने अम्माला घट्ट मिठी मारली. अप्पाने ही त्याच्या डोक्यावरून हात फिरविला. आता पुढे..) त्याला हे सगळे कधी मुग्धाला सांगतोय असे झाले होते. पण त्या आधी त्याला साहीलची खबर घ्यायची होती. रात्री साहील जेवायला सिलूच्या घरी आला. मस्तीमजा करत सगळ्यांची जेवणे झाली आणि सगळे गप्पा मारायला बसले. काहीवेळाने अप्पा झोपयला निघून गेले. मग हॉलमध्ये फक्त अम्मा, सिलू आणि साहील बसले होते. साहील हा सिलू भारतात आल्यापासून त्याच्याशी एकदाही मोकळेपणाने बोलला नव्हता. काहीतरी चुकीचे वागल्याचे भाव सिलूकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावर असायचे. सिलूने ते अचूक