पुढे... प्रेम लपवता येत नाही म्हणतात... खरं आहे...पण काही वेळा प्रेम हे अलगद जपून ठेवल्या जातं, ते बोलून दाखवल्या जात नाही आणि मिरवल्याही जात नाही...ते प्रेम फक्त त्या दोन व्यक्तींनाच कळत असतं, तिसऱ्या कोणालाही त्याची फारशी कल्पना नसते...अबोल असतं पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते व्यक्त होतंच असतं...अशी ही नजरेची, स्पर्शाची, इशाऱ्यांची भाषा त्या दोन लोकांना कधी अवगत होऊन जाते हे त्यांनाही कळत नाही....असं प्रेम खूप विशेष असतं... अगदी खास..!!आणि सोप्प नाही हं प्रेमाची ही परिभाषा समजणं...त्यामुळेच तर मनोहर श्याम जोशी म्हणतात की प्रेमाचा आनंद प्रेमाच्या पिडेतून वेगळा करता येत नाही...जिथे आनंद अन पीडा सोबत नांदत असतात ते घर म्हणजे